शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 10 ऑक्टोबर 2022 (09:53 IST)

Mulayam Singh Yadav passed awayमुलायमसिंह यादव यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन

Mulayam singh
मुलायम सिंह यादव यांच्या निधनाची बातमी: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांचे निधन आज (10 ऑक्टोबर) सकाळी 8.16 मिनिटावर वयाच्या 82 व्या वर्षी गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात झाले. मुलायम सिंह यादव यांना श्वास घेण्यास त्रास आणि रक्तदाब कमी झाल्याच्या तक्रारीनंतर 22 ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती सुधारत नव्हती आणि 1 ऑक्टोबरच्या रात्री त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते, जिथे त्यांचा उपचार सुरू होता.  
 
जुलैमध्ये पत्नी साधना गुप्ता यांचे निधन झाले होते 
 
मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे या वर्षी जुलैमध्ये निधन झाले होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साधना या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे 2003 मध्ये निधन झाले. मालती देवी या अखिलेश यादव यांच्या आई होत्या.
 
1992 मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली  
लोहिया चळवळीत सक्रिय सहभाग घेणाऱ्या मुलायम सिंह यादव यांनी 4 ऑक्टोबर 1992  रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली. मुलायमसिंह यादव यांना राजकीय आखाड्याचे पैलवान म्हटले जायचे. प्रतिस्पर्ध्यांना चिमटे काढण्यात ते पटाईत होते. देशातील सर्वात मोठ्या राज्य उत्तर प्रदेशच्या राजकारणात त्यांनी अशी उंची गाठली जी कोणत्याही नेत्याचे स्वप्न असते. त्यांनी तीनदा राज्याची सूत्रे हाती घेतली. ते देशाचे संरक्षण मंत्रीही झाले. ते आठ वेळा उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.

Edited by : Smita Joshi