शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 मे 2022 (15:15 IST)

नवाब मलिक यांची प्रकृती खालावली; जे जे हॉस्पिटलच्या ICU मध्ये दाखल

nawab malik
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री तसेच सध्या अटकेत असलेले नवाब मलिक यांची प्रकृती खालावली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) त्यांना अटक केली आहे. सध्या ते ईडीच्या अटकेत आहेत. मलिक यांची काही दिवसांपासून तब्ब्येत बरी नाही. त्यातच ते तुरुंगामध्ये पडले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज सकाळी त्यांचा रक्तदाब कमी झाला तसेच पोटाचेही दुखणे असल्याने त्यांना तातडीने जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आता अतिदक्षता विभागात (आयसीयु) मध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
मलिक हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, मनीलाँड्रींग प्रकरणात ईडीने मलिक यांना अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते तुरुंगात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे वकीलांनी सांगितले आहे. आज सकाळी त्यांना जे जे हॉस्पिटलमध्ये दाकल करण्यात आले. पोटाचे दुखणे आणि त्यातच कमी झालेला रक्तदाब यामुळे त्यांची प्रकृती खालावली. परिणामी, त्यांना आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे हॉस्पिटलने सांगितले आहे.