सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 25 मे 2022 (17:53 IST)

मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, सामान्य पावसाचा अंदाज

mansoon
गेल्या दोन-तीन दिवसांचा अपवाद वगळता देशभरात कडक उन्हाचा प्रकोप आहे. कडाक्याच्या उन्हामुळे अनेक गोष्टींवर परिणाम झाला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला फक्त एकाच गोष्टीची प्रतीक्षा असते, ती म्हणजे मान्सून. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD)आधीच सांगितले आहे की, यावेळी मान्सून वेळेपूर्वीच देशात दाखल होईल. IMD मुंबई विभागाचे प्रमुख जयंत सरकार यांनी सांगितले की, यावेळी मान्सून केरळमध्ये 27 मे रोजीच दाखल होईल. साधारणपणे 1 जून रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचतो. गेल्या वर्षी 3 जूनच्या सुमारास केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता, मात्र यंदा तो लवकर येण्याची शक्यता आहे.
 
 कोकणात पाच दिवस पाऊस
जयंत सरकार म्हणाले की, यंदा मोसमी पाऊस सामान्य होण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की यावेळी 99 टक्के पाऊस पडेल तर मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल. यानंतर, कोकण आणि गोवा भागात 5 दिवस हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर राज्याच्या इतर भागातही हलका पाऊस पडेल. आयएमडीच्या म्हणण्यानुसार नैऋत्य मान्सून वेळेपूर्वी अरबी समुद्रात दाखल होईल. पुढील 48 तासांत नैऋत्य अरबी समुद्र, मालदीव, दक्षिण बंगालचा उपसागर आणि उत्तर भागात काही ठिकाणी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी हवामान खात्याने पुढील पाच दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. म्हणजेच उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार असून, तापमानात लक्षणीय वाढ होणार नाही.
mansoon
17 वर्षांचा मान्सूनचा अंदाज खरा
दरम्यान, हवामान खात्याने तामिळनाडू, आंध्र प्रदेश किनारी भाग, आसाम, हिमाचल प्रदेश आणि ओडिशाच्या वेगळ्या भागात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. येथे उत्तराखंड, विदर्भ आणि हरियाणामध्येही गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बिहारमधील सिवान आणि मुझफ्फरपूरमध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारत हवामानशास्त्र विभाग (IMD)ने म्हटले आहे की यावेळी भारतात 2022 मध्ये नैऋत्य मान्सून सामान्य राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच, संपूर्ण देशभरात पावसाचे एकसमान वितरण असण्याचा अंदाज आहे. तथापि, उत्तर, दक्षिण आणि ईशान्य भारताच्या काही भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने म्हटले आहे की, गेल्या 17 वर्षांतील एक वर्ष वगळता केरळमध्ये मान्सून सुरू होण्याचा अंदाज खरा ठरला आहे. केवळ 2015 मध्ये हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला नाही.