गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2019 (10:06 IST)

पब्जी खेळू दिले नाही, मुलाने वडिलांची गळा चिरुन केली हत्या

कर्नाटकातील काकती येथे पब्जी गेम खेळून दिला नसल्याने एका विकृत मुलाने वडिलांची गळा चिरुन हत्या केली. या विकृत मुलाने वडिलांची हत्या करुन त्यांचे धड वेगळे करत शरीराचे तीन तुकडे केले. रघुवीर कुंभार असं या मुलाचं नाव आहे.
 
या घटनेत रात्री उशिरापर्यंत मुलगा पब्जी गेम खेळत होता. गेम खेळणाऱ्या मुलाला वडिलांनी झोप म्हणून सांगितले. पण त्याने वडिलांचे ऐकले नाही. मुलगा ऐकत नसल्याने वडिलांनी मोबाईल काढून घेतला. मोबाईल काढून घेतल्यामुळे संतापलेल्या मुलाने थेट वडिलांवर हल्ला करत त्यांची निर्घुण हत्या केली. यावेळी त्याने आईला दुसऱ्या घरात कोंडून ठेवले आणि घरातील विळ्याने वडिलांच्या शरीराचे तीन तुकडे केले.
 
रघुवीर हा तीन वेळा डिप्लोमा परिक्षेत नापास झाला होता. तो घरी बसून दिवस-रात्र मोबाईलवर पब्जी गेम खेळत होता. तर त्याचे वडील शंकर कुंभार हे तीन महिन्यापूर्वीच जिल्हा सशस्त्र पोलीस दलातून निवृत्त झाले होते. मानसिक विकृतीतून ही हत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.