रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2017 (11:09 IST)

भारताचे 'क्रॉस-बॉर्डर' ऑपरेशन, तीन पाकिस्तानी सैनिक ठार

भारतीय लष्कराच्या या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून एक सैनिक जखमी झाला आहे. काश्मीरच्या केरी सेक्टरमध्ये शनिवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकच्या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून यशस्वीपणे कारवाई केली.
 
सोमवारी संध्याकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पुंछ सेक्टरमधून सीमारेषेपलीकडे गेले. येथून भारतीय जवानांनी पाकच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केला व त्याठिकाणी गस्त घालत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. हे सैनिक ‘५९ बलूच रेजिमेंट’चे होते. याशिवाय, हल्ल्यात पाकिस्तानचे आणखी पाच जवानही जखमी झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कारचे हे पहिलेच क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन होते. आतापर्यंत पुढे आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले आहेत. मात्र, भारतीय लष्कराच्या दाव्यानुसार या हल्ल्यात पाकिस्तानची आणखी मोठी हानी झाली आहे. पाकिस्तानचे किमान सहा सैनिक या हल्ल्यात ठार झाले आहे.