रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 17 जानेवारी 2018 (12:34 IST)

पतंजलीची उत्पादने आता ऑनलाइनही मिळणार

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या उत्पादनांची सध्या बाजारात चांगलीच चलती आहे. केवळ पतंजलीच्या काही ठरावीक दुकानांमध्ये उपलब्ध असणारी ही उत्पादने आता महत्त्वाच्या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्‌सवर उपलब्ध होणार असल्याची माहिती रामदेवबाबा यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
 
ऑनलाइन शॉपिंगसाठी लोकप्रिय असणार्‍या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, बिग बास्केट यासारख्या इतर अनेक वेबसाइट्‌सवर पतंजलीची उत्पादने मिळणार आहेत. शिवाय, पतंजलीच्या patanjaliayurved.net या वेबसाइटवरही ही उत्पादने खरेदी करता येणार आहेत. पुढील 50 वर्षांत काय करायचे आहे, याची योजना आखून त्या दृष्टीने आम्ही तयारी केली आहे. संपूर्ण जग जिंकायचे या ध्येयाने आम्ही पुढे जात आहोत, असे रामदेवबाबा म्हणाले. पतंजलीच्या वेगवेगळ्या उत्पादनांना ई-कॉमर्स वेबसाइट्‌सवरही उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.