सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (17:45 IST)

नबन्ना अभियान राबवणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज,अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

कोलकाता मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ पश्चिम बंगालच्या शेकडो विद्यार्थ्यांनी मंगळवारी कोलकात्यात दोन ठिकाणांहून नबन्ना अभियान' पदयात्रा सुरू केली. या पदयात्रेला पांगवण्यासाठी पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या.
 
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत. तसेच या घटनेला जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे. नबन्ना हे पश्चिम बंगाल सरकारचे सचिवालय आहे.

मंगळवारी दुपारीआंदोलक नबन्नामोहिमेचा भाग म्हणून राज्य सचिवालय कडे जात असताना  हावडा मैदान परिसरातील जीटी रोडवर पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना पांगविण्यासाठी लाठीचार्ज करत अश्रुधाराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. राज्या सचिवालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर लावलेले बेरिकेड्स पाडण्याचा प्रयत्न केला. 

या आंदोलनात पोलिसांनी अनेक आंदोलकांना अटक केली आहे.एका महिला आंदोलकांनी विचारले आम्हाला पोलिसांनी मारहाण का केली आम्ही एका मृत डॉक्टरला न्याय मिळावा या साठी एकत्र येऊन रॅली काढत आहोत. आम्ही कुठलाही कायदा मोडला नाही. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा. 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी महिलांना सुरक्षा पुरवत नसल्याचा आरोप आंदोलक करत आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळे आर् जी कार रुग्णालयात घटना घडली.मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढण्यात आलेल्या मोर्चात सहभागी झालेल्या एका आंदोलकाने सांगितले की काहीही झाले तरी आम्ही नबान्नाला पोहोचू.

आम्हाला मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हवा आहे. राज्य सचिवालय गाठावे लागेल. त्यांचे सरकार या जघन्य गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. प्रशासन घटना दडपण्याचा प्रयत्न करत आहे. ममता बॅनर्जी यांनी जबाबदारी स्वीकरून राजीनामा देण्याची मागणी आंदोलक करत आहे. 
Edited by - Priya Dixit