रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (14:07 IST)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सुरुवात

- नागपूर : देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळाली नाही, मात्र देशासाठी जगण्याची संधी मिळाली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : 2022 पर्यंत देशाला महापुरुषाच्या स्वप्नातील भारत बनवायचे आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : 21 व्या शतकात देशाला आधुनिक स्वरूपात पाहायचे असेल तर ऊर्जा हा महत्त्वाचा घटक आहे. देशाने 175 गेगावाट उर्जेचे स्वप्न पाहिले आहे.त्याची सुरवात झाली आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : बाबासाहेबांना आयुष्यातील प्रत्येक वळणावर विष मिळालं, पण त्यांनी सर्वांवर अमृताचा वर्षाव केला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : बाबासाहेब आंबेडकरांचे विचारच या देशाच्या प्रगतीसाठी प्रेरणा ठरणार आहेत - नरेंद्र मोदी, पंतप्रधान
- नागपूर : बाबासाहेबांना अनेक संकटाचा सामना करावा लागला.पण त्यांच्या विचारांच्या उंचीने सर्व घटकांचा विकास पाहिला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक घटकाचा विकास होण्यासाठी वैचारिक मंत्र दिला, त्यांच्या या प्रेरणेला आता मूर्त स्वरूप प्राप्त होत आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : प्रभावितपणे पुढे जाण्याची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळते - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : धम्मचक्र प्रवर्तनाची प्रेरणा या भूमीने दिली - पंतप्रधान नरेंद्र मोदी
- नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठीतून भाषणाला सुरुवात
- नागपूर : पंतप्रधान आवास योजनेच्या 21 शहरातील कामाला नागपूर येथून सुरुवात झाली आहे. 2019 पर्यंत राज्यातील सर्व गरिबांना घरे देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- नागपूर : भीम अॅपमुळे देशात पारदर्शक व्यवहार होतील,राज्यांनी या योजना शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत,2018 पर्यंत राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतीत या योजनेला पोहोचवणार.15 हजार ग्रामपंचायत डिजिटल करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- नागपूर : बाबासाहेब आंबेडकर यांच्या आर्थिक चिंतनावर आधारित स्वप्न पंतप्रधान मोदीजी साकारत आहेत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- नागपूर जिल्हा देशातील डिजिटल जिल्हा ठरला आहे, ही बाब गौरवाची. नागपूर एज्युकेशन हब होत आहे - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
- नागपूर : देश आर्थिक महासतेकडे वाटचाल करत आहे, सर्व ठिकाणी पारदर्शकता येत आहे, ही चांगली सुरुवात आहे - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
- नागपूर : गरिबांचा विकास होण्याचा उद्देश समोर ठेऊनच डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू झाली आहे, या माध्यमातून गैरप्रकार रोखले जातील - नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
- नागपूर : डिजिधन योजनेतील विजेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान.लातूरच्या श्रद्धा मोहन यांना 1 कोटींचा पुरस्कार, रा.जी. राधाकृष्णन (चेन्नई)यांना 50 लाख रुपये तर रागिनी उपदेकर (ठाणे) यांना 25 लाख रुपयांचे पारितोषिक 
- नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पोस्टल तिकीटाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन, तिकीटावर दीक्षाभूमीचे छायाचित्र⁠⁠⁠⁠. भीम अॅपचेही पंतप्रधानांनी केले लोकार्पण.
- नागपूर : आम्ही देशाला डिजिटल करतो आहे, गरिबांपर्यंत खऱ्या अर्थाने योजना पोहोचत आहेत. हे या सरकारचे यश आहे. - रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री
- नागपूरला आयटीचे केंद्र बनवायचं आहे. त्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. - रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री
- नागपूर : मोबाइल क्षेत्रात क्रांती होत आहे, 72 नवीन कंपन्या आल्या. 12 कोटी नवीन मोबाइलचे उत्पादन झाले - रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री
- नागपूर : डिजिटल इंडियाचे स्वप्न साकारत आहे. दिल्लीतून निघालेला एक रुपयादेखील गरिबांपर्यंत पोहोचला पाहिजे हे आमचे धोरण आहे - रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेचा नागपुरातून शुभारंभ.
- नागपूर : मनकापूर क्रीडा संकुलात पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल, मोदींच्या हस्ते 'आधार पे'च अनावरण. आयआयटी, आयआयएम, एम्सचे शुभारंभ.
- नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी कोराडीहून मानकापूरकडे रवाना, पंतप्रधानांच्या हस्ते भीम आधार अॅपचे होणार लोकार्पण.
- नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवलेही उपस्थित.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंत्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात दाखल, दीक्षाभूमीवर महामानवाला करणार अभिवादन.
- नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन, बारा चौकात होणार पंतप्रधान मोदींचे स्वागत, नागपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त.
- डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची ट्विटरवरुन मानवंदना.