शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शनिवार, 6 मार्च 2021 (11:28 IST)

PM मोदी यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला, यांना जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुक्रवारी केंब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएट्स वीक ((Cambridge Energy Research Associates Week) ग्लोबल एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल लीडरशिप अवॉर्ड प्रदान करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फ़रन्सद्वारे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी हा सन्मान स्वीकारला आणि देशातील लोकांना ते समर्पित केले.
 
या प्रसंगी आपल्या संक्षिप्त भाषणात ते म्हणाले की, “मी सेराविक ग्लोबल एनर्जी आणि पर्यावरणीय नेतृत्व पुरस्कार मोठ्या नम्रतेने स्वीकारतो. हा पुरस्कार मी आपल्या महान देशातील लोकांना समर्पित करतो. पर्यावरणाला नेहमी मार्ग दाखविणार्‍या या भूमीच्या उत्कृष्ट परंपरेला मी हा पुरस्कार समर्पित करतो. "
 
2016मध्ये हा पुरस्कार सुरू झाला होता
2016 मध्ये सेराविक ग्लोबल एनर्जी आणि एन्व्हायर्नमेन्ट लीडरशिप अवॉर्ड सुरू करण्यात आला होता. जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रात वचनबद्ध नेतृत्वासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे.
 
सेरावीची स्थापना 1983 मध्ये झाली होती
सेरावीची स्थापना डॉ. डॅनियल यर्गिन यांनी 1983 मध्ये केली होती. त्याच्या स्थापनेपासून, सेरावीक दरवर्षी मार्च महिन्यात हृयूस्टनमध्ये आयोजित केला जातो. जगातील आघाडीच्या ऊर्जा मंचांमध्ये याची गणना केली जाते. यावर्षी हा कार्यक्रम 5 मार्च या कालावधीत डिजीटल पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे.