शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (16:09 IST)

अवनी वाघीण मृत्यू राहुल गांधी यांची सरकारवर टीका

मनेका गांधी, उध्वव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. अवनीला नियम तोडून मारले गेले असा आरोप केला आहे. तर तिच्या मृत्यू मुळे अनेक प्रश्न विचारले गेले आहेत. त्यातही इतक्या काळोखात तिच्या वर्मी कसा काय निशाना लागला असा प्रश्न विचारला जातौय. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर गांधी गिरी करत सरकारच्या वर्मी घाव करत प्रश्न वजा गांधी विचार मांडला आहे. राहुल सोशल मिडीयावर लिहितात की ज्या देशात प्राणी दया किवा प्राणी कसे वागवले जातात त्यावरून देश कसा आहे समजते - महात्मा गांधी. यवतमाळमध्ये ‘अवनी’ वाघिणीला शुक्रवारी गोळ्या घालून ठार मारण्यात आले. यामुळे देशभरातून भाजपवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी देखील ट्वीट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे सरकार पुरते अडचणीत सापडले आहे.