रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 जुलै 2017 (07:53 IST)

बाबा रामदेव यांची पराक्रम सुरक्षा संस्था' सुरु

बाबा रामदेव यांनी आता सुरक्षा प्रशिक्षण देणारी संस्था सुरु केली आहे.'पराक्रम सुरक्षा संस्था' या नावाने नवी संस्था त्यांनी सुरु केली असून या माध्यमातून ते देशभरातील युवकांना लष्करी प्रशिक्षण देणार आहेत.   
 

देशभरात ५ कोटी सुरक्षा रक्षकांची गरज आहे.मात्र चांगली गार्ड मिळत नाहीत. ही गरज आम्ही पूर्ण करू, असे बाबा रामदेव यांचे प्रवक्ते एस.के.तिजारवाला यांनी सांगितले.'पराक्रम'च्या माध्यमातून आम्ही देशभरातील युवकांना चांगले प्रशिक्षण आणि पगार देऊ, असे ते म्हणाले.

'पराक्रम' संस्थेत येणाऱ्या व्यक्तीकडे नैतिक मूल्य आणि देशप्रेम या दोन गोष्टी हव्यात,असे तिजारवाला यांनी सांगितले.उत्तम आरोग्य आणि शिक्षण घेतलेल्या युवकांना संधी दिली जाणार आहे.या संस्थेतील युवकांना भारतीय लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करूनच त्यांची नियुक्ती केली जाणार आहे.