बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जानेवारी 2018 (15:17 IST)

भयानक : आठ महिन्याच्या चिमुरडीवर भावाकडून बलात्कार

दिल्लीच्या शकूरबस्ती भागात आठ महिन्याच्या चिमुरडीवर तिच्या 28 वर्षीय चुलत भावाने बलात्कार केला आहे. चिमुरडीची आई रविवारी रात्री कामावरून परतल्यावर तिला या घटनेची माहिती मिळाली. जखमी अवस्थेत मुलीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं असून तिला सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. पीडित चिमुरडीचं कुटुंबीय शकूरपूर वस्तीमध्ये राहते. तिचे वडील मजूर असून आई इतर घरी धुणं-भांड्यांची काम करते. 
 
रविवारी मुलीची आई तिला नातेवाईंकांकडे सोडून कामावर गेली. काहीवेळाने मुलीचे वडिलही कामावर गेले. संध्याकाळी उशिरा कामावरून आल्यावर चिमुरडी सतत रडताना आईला दिसती. आरोपीने मुलीबरोबर खेळण्याचं नाटक करून तिला वरच्या मजल्यावर नेलं व तेथे तिच्यावर बलात्कार केला.