रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (10:13 IST)

सायबर धमकी आणि मानहानीचा गुन्हा, सौरभ गांगुलीची पोलिसांकडे तक्रार

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी कोलकाता पोलिसांकडे सायबर बुलिंग आणि मानहानीची तक्रार दाखल केली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सौरभ गांगुलीच्या तक्रारीच्या आधारे कोलकाता पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार सौरभ गांगुलीच्या सचिवाने दिलेल्या तक्रारीत असे लिहिले की, "मी मृण्मय दास नावाच्या व्यक्तीचा समावेश असलेल्या सायबर बुलिंग आणि बदनामीचे प्रकरण तुमच्या निदर्शनास आणण्यासाठी लिहित आहे. या व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. जो अपमानास्पद भाषेत आहे. सौरव गांगुलीला लक्ष्य करण्यासाठी वापरण्यात आले आहे जे त्याच्या प्रतिष्ठेला घातक आहे.
 
तसेच पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, सौरभ गगुलीच्या सचिवाने मंगळवारी रात्री कोलकाता पोलिसांच्या सायबर विभागाला ईमेल पाठवून तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गांगुलीच्या सचिवाने ई-मेलसोबत एक व्हिडिओ लिंकही शेअर केली आहे. आम्हाला हा ई-मेल मिळाला असून आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत, असे पोलीस अधिकारींनी सांगितले आहे.

Edited By- Dhanashri Naik