शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (12:57 IST)

सर्पमित्र वावा सुरेश यांना कोब्राने चावा घेतला, रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक

केरळमध्ये साप पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेले सर्पमित्र वावा सुरेश सध्या यांना  गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले गेले आहे. सोमवारी तो कोट्टायममध्ये किंग कोब्रा पकडण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान सापाने चावा घेतला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
कोट्टायम जिल्ह्यात बचाव मोहिमेदरम्यान हा अपघात झाला. कोट्टायमच्या कुरिची गावातील एक स्थानिक रहिवासी बचाव कार्याचा व्हिडिओ शूट करत होता ज्यामध्ये सुरेशला चावणारा सापही पकडला गेला होता. सध्या वावा सुरेश कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्हेंटिलेटरवर दाखल आहेत.
 
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सुरेशने सापाला गोणीत ठेवण्याचा प्रयत्न करताच तो त्यांच्या पायाजवळ आला आणि गुडघ्याच्या वरच्या जागेवर चावला. मात्र, सापाला गोणीत ठेवण्यात त्यांना यश आले.
 
रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक
स्थानिक लोकांनी सुरेशला खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात आणले असता सुरेश बेशुद्ध अवस्थेत असल्याचे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
 
कोट्टायम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. जयकुमार टीके म्हणाले, 'वावा सुरेश सध्या व्हेंटिलेटरवर असून औषधांचा त्यांच्यावर परिणाम होत आहे. 18 तासांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. आता त्याचा रक्तदाब आणि हृदयाचे ठोके सामान्य आहेत.
 
2020 मध्ये पिट वाइपर चावला
केरळमधील घरे आणि गावांमध्ये साप बचावाच्या आवाहनाला त्वरीत प्रतिसाद देणारे वावा सुरेश हळूहळू प्रसिद्धीच्या झोतात आले. तो या सापांची सुटका करून जंगलात सोडतो.
 
एका मुलाखतीत सुरेशने दावा केला की, अशा बचाव कार्यात डझनभर वेळा साप चावला आहे. 2020 मध्ये, त्यांना पिट व्हायपर प्रजातीच्या सापाने चावा घेतला होता, त्यानंतर त्याला तिरुअनंतपुरममधील हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.