गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 7 एप्रिल 2022 (21:26 IST)

तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, म्हहणत संजय राऊत यांचा हल्लाबोल

not survive
तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हीही उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
 
मुंबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांसह भाजपवर निशाणा साधला. आयएनएस विक्रांतचा घोटाळा भाजप नेत्यांकडून झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रात गावपातळीवर शिवसैनिकांचे आंदोलन झाले. हा संताप आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हल्ले केले जात आहेत. याविरुद्ध हा उसळलेला आगडोंब आहे. ही सुरुवात आहे. ठिणगी पडली आहे. यापुढे जसजशी त्यांची पावले पडतील, तशी आमची पावले पडतील, या शब्दांत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
 
तुम्ही आमचे काय करणार? केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप आमच्यावर हल्ले करत आहे. ते फारतर आम्हाला तुरुंगात पाठवतील. माझी तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहे. पण यापुढचे २५ वर्ष तुमचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही याची तजवीज तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खणली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.