रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चालत्या विमानात राष्ट्रगीत, प्रवासी चक्रावले!

इंदूर- विमानप्रवास करताना सीटबेल्ट बांधणे बंधनकारक असते. तर, राष्ट्रगीत सुरू झाल्यावर ते संपेपर्यंत एका ठिकाणी स्थिर उभे राहावे असा दंडक आहे. मात्र, यातील एक नियम पाळताना दुसरा मोडण्याची वेळ आली तर? 
 
स्पाइसजेट च्या एसजी 1044 या विमानातील प्रवाशांवर नुकताच असा प्रसंग ओढवला. स्पाइसजेटचे एक विमान लँड होत असताना त्यातील उद्घोषणा यंत्रणेवर अचानक राष्ट्रगीत सुरू झाले. हवाई प्रवासाच्या नियमानुसार त्यावेळी प्रवाशांनी सीटबेल्ट बांधलेले असल्याने त्यांना उठता येईना. नेमके काय करावे हेच प्रवाशांना सुचेना!
 
या प्रकाराबद्दल याच विमानातील एक प्रवासी पुनीत तिवारी यांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केली. सीटबेल्ट बांधलेले असल्याने प्रवासी व क्रू मेंबरना राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर मध्येच बंद करण्यात आले आणि ते पुन्हा सुरू करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला. तिवारी यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार केला असून या घटनेमुळे विमानकंपनीवरील विश्वास उडाल्याचे त्यांनी सांगितले.