विद्यार्थिनींची पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील गीतम विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थिनी रेणू श्री (18) हिने शुक्रवारी दुपारी रुद्र राम येथील विद्यापीठ इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
या अपघातात तिला अनेक जखमा होऊन तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, रेणू श्री तीन महिन्यांपूर्वीच इंजिनीअरिंग आणि सायन्स ऑफ कॉम्प्युटिंग क्षेत्रात विद्यापीठात दाखला घेतला होता. तिचे आई-वडील हैदराबादच्या माधापूर भागात राहतात.या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये शुक्रवार 5 जानेवारी रोजी रेणूश्री इमारतीच्या पाचव्या मजल्यावर बाल्कनीच्या काठावर बसलेली आहे.
इतर लोक तिला ओरडून मागे जाण्यास सांगत आहे. अचानक ही मुलगी उडी मारते.पोलिसांना या घटनेची माहिती मिळतातच ते घटनास्थळी उपस्थित झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाटनचेरू प्रादेशिक रुग्णालयात हलवण्यात आले. गुन्हा पोलिसांनी प्रकरण दाखल करण्यात आले असून मुलीने असे टोकाचे पाऊल का घेतले हे समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास लावत आहे.
Edited by - Priya Dixit