करवा चौथ दिवशी पती-पत्नीची आत्महत्या
करवा चौथच्या रात्री पती-पत्नीने आत्महत्या केल्याची घटना राजस्थानची राजधानी जयपूर मध्ये उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पत्नीने रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या असून पत्नीचा छिन्नविछिन्न मृतदेह पाहून पतीने घरी येऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच पती-पत्नीमध्ये भांडण झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. पती घरी उशिरा येण्यावरून या दोघांमध्ये वाद झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पोस्टमोर्टमसाठी पाठवले.
तसेच पोलिसांनी सांगितले की, करवा चौथच्या रात्री पती-पत्नी यांच्यात वाद होऊन जोरदार भांडण झाले. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ही महिला रागाच्या भरात घरातून निघून गेली. त्यानंतर तिचे पतीने देखील घर सोडले. जयरामपुरा कल्व्हर्टजवळ रेल्वे रुळावर येताना पाहून या महिलेने उडी घेत आत्महत्या केली.
पत्नीचा मृतदेह रेल्वे रुळावर पडलेला पाहून या महिलेचा पती घरी परतला आणि भावाला व्हॉट्सॲप मेसेज पाठवला आणि लिहिले की, 'भाऊ, मी हरलो, माफ करा. मेसेज पाठवल्यानंतर या मृत महिलेच्या पतीने घरातील खोलीत साडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच रात्री दीड वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळावर एका महिलेचा मृतदेह विकृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती हरमदा पोलीस स्टेशनला मिळाली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृताची ओळख पटली व कुटुंबीयांशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. तसेच कुटुंबीयांनी पतीच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना दिली. तसेच पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.