रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2017 (11:49 IST)

गोवंश विक्री बंदीच्या अधिसूचनेला संपूर्ण देशात स्थगिती

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या गोवंश विक्री बंदीच्या अधिसूचनेला संपूर्ण देशभरात स्थगिती दिली आहे. सरन्यायाधीश जे एस खेहर आणि न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

केंद्र सरकारने गोवंश विक्री बंदीसाठी अधिसूचना जारी केली होती. पण मद्रास हायकोर्टाने त्या अधिसूचनेला स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती मद्राससह संपूर्ण देशभरात लागू झाली आहे. सुप्रीम कोर्टाने ऑल इंडिया जमियतुल कुरेशी अॅक्शन कमिटीच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिला आहे. या याचिकेत केंद्र सरकारने 23 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आलं होतं.

स्थानिक बाजार जिथे गोवंशाची विक्री होते, तिथे राज्य सरकार निर्बंध लावत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकरणात ही अधिसूचना लागू होणार नाही, असं केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात सांगितलं.