रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

पुन्हा दहशतवाद्याकडून लष्कराच्या ताफ्यावर हल्ला

पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी श्रीनगर - जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पंपोरे येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला केला आहे. यावेळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला  आहे. आता लश्कराकडून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी उल्लंघन आणि हल्ले केले जात आहेत. याआधी बुधवारी जवानांसोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. अनंतनाग आणि बारामुल्ला येथे ही चकमक झाली होती.