शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 जून 2020 (16:20 IST)

क्रूरपणाचा कळस, हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला दिले

Photo : Facebook
केरळमधील मल्लपुरम जिल्ह्यात स्थानिक गावकऱ्यांनी एका हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिल्यामुळे तिचा मृत्यू झाला. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे पुढे आली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये तीव्र संताप व्ल्यायक्नंत होत आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे.
 
केरळच्या Silent Valley National Park चे वॉर्डन सॅम्युअल पचाऊ यांनीयाबद्दल माहिती दिली. “या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांचा आम्ही शोध घेऊ. एखाद्या प्राण्याची हत्या करणं गुन्हा आहे आणि गुन्हेगारांना पकडल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही.”
 
केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यात स्थानिकांनी एका गर्भवती हत्तीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा अखेरीस मृत्यू झाला. “हे फळ खाल्ल्यानंतर ते तिच्या पोटात फुटलं.  हत्तीणीची जीभ आणि तोंडाला चांगलीच दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हतं.  मोहन क्रिश्नन यांनी मल्याळम भाषेत हा घटनाक्रम आपल्या फेसबूक अकाऊंटवर मांडला आहे.