युट्युब वरील अनेक चॅनल्सना हाय कोर्टाने बजावला समन्स
बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हिच्या प्रकृतीविषयी काही युट्युब चॅनल्सनी अफवा पसरवल्या होत्या.या संदर्भात बच्चन कुटुंबीयांनी दिल्ली हाय कोर्टात चॅनल्स विरोधात याचिका दाखल केली होती.या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये चॅनल्सना समन्स बजावला आहे.
दिल्ली हाय कोर्टानं युट्युबला आक्षेपार्ह माहिती काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. एवढंच नाही तर कोर्टानं युट्युब वरील अनेक चॅनल्सना समन्स देखील बजावल आहे. आराध्यानं तिचे वडील अभिषेक बच्चन यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल केली होती. आराध्याचं म्हणणं होतं की या वादग्रस्त व्हिडीओच्या माध्यमातून ती गंभीररित्या आजारी असल्याचं दाखवलं गेलं होतं.