शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 13 मे 2024 (23:25 IST)

केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना निवडणूक प्रचारासाठी सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1 जून रोजी त्याला पुन्हा आत्मसमर्पण करावे लागणार आहे. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याची विनंती करणारी याचिका फेटाळली. केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याच्या याचिकेवर सोमवारी (13 मे) न्यायालयात सुनावणी झाली, आणि केजरीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी करण्याचा अधिकार नाही असं म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. 
 
सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सांगितले की, अशा परिस्थितीत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे योग्य आहे, पण केजरीवाल यांच्या अटकेनंतर यात कोणताही कायदेशीर मुद्दा उरलेला नाही. त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याचा अधिकार नाही, म्हणून याचिका फेटाळली.

Edited by - Priya Dixit