रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 12 मे 2024 (15:19 IST)

मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यावर उद्धव ठाकरे, ममता बनर्जी, तेजस्वी यादव तुरुंगात असतील- अरविंद केजरीवाल

Arvind Kejriwal
दारू घोटाळा प्रकरणात तिहारच्या तुरुंगातून दिल्लीचे मुख्यमंत्री आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे अंतरिम जामिनावर बाहेर आले आहे. त्यांनी बाहेर आल्यावर पत्रकार परिषद घेतली आणि मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यांना अंतरिम जामीन 1 जून पर्यंत मिळाला असून त्यांना पुन्हा 2 जून रोजी तुरुंगात जावे लागणार आहे. 

त्यांना अंतरिम जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारा संदर्भात कोणतीही अट घातलेली नाही. ते निवडणूक प्रचार करू शकतात, पत्रकार परिषद घेऊ शकतात. असं कोर्टाने मंजूर केले आहे. 
केजरीवाल यांनी बाहेर आल्यावर पत्रकार परिषद घेतली आणि त्यात त्यांनी मोदींवर आरोप केले. 

ते म्हणाले, मोदींना या देशातील सर्व नेत्यांना संपवायचं असून ते सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात पाठवतील. हे मी लिहून देतो. मोदी लोकसभा निवडणूक जिंकल्यावर आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान बनल्यावर ते काहीच दिवसात ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, स्टालिन, तेजस्वी यादव सारख्या नेत्यांना तुरुंगात पाठवतील. त्यांनी भाजपच्या काही नेत्यांचं राजकारण संपवलं आहे. मोदी निवडून आल्यावर उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री बदलणार. मी सांगत आहे. की मोदी सरकार आल्यावर योगींना बाजू करून अमितशाह यांना पंतप्रधान केले जाईल.  कारण भाजपमध्ये 75 वर्षांनंतर निवृत्ती आहे.आणि पंतप्रधान मोदी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षात पदार्पण करणार आहे. ते निवृत्त होतील. मग अमित शाह यांना पंतप्रधान केले जाईल.  
 
मी सुप्रीम कोर्ट चे आभार मानतो की त्यांनी मला जामीन दिला. मी देशभरात फिरणार आहोत मी तुरूंगातुन बाहेर आल्यावर लोकांशी बोललो. त्यावरून यंदा 4 जून नंतर भाजपची सरकार येणार नसल्याचा अंदाज येत आहे. सर्व राज्यात भाजपची जागा कमी होणार असून केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार येण्याचा दावा केजरीवाल यांनी केला. 
 
Edited by - Priya Dixit