सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जेके: दोन दहशतवादी ठार, एक जवान शहीद

जम्मू-कश्मीर येथील सोपोर भागात पहाटे दहशतवाद्यासोबत झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यात एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
 
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गुरुवारी देखील त्राल येथे हिंदुस्थानी लष्कराच्या तळावर हल्ला केला. त्यात एक जवान शहीद झाला होता तर एक जवान गंभीर जखमी झाला होता. यावर हिंदुस्थानी लष्कर बारकाईने नजर राखत असून या भागात अन्य दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.