अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम व्हेंटिलेटरवर
अडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला कराचीमधील एका रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले असून त्याला नेमके काय झाले आहे याबद्दल मात्र उलटसुलट चर्चा होत आहेत डी कंपनीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदला २0 दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला व त्याच्या शरीराचा उजवा भाग बधीर झाला आहे. अन्य काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्याची प्रकृती गंभीर आहे.
मात्र त्याचा खास माणूस मानला जाणार्या छोटा शकीलने या सार्या बातम्यांचा इन्कार केला असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे म्हटले आहे. तर २२ एप्रिल रोजी त्याच्यावर कराचीमधील प्रसिद्ध डॉक्टरांनी ब्रेनट्यूमरची शस्त्रक्रिया केली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाल्याचे न आढळल्याने त्याला व्हेन्टिलेटरवर ठेवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भारतीय गुप्तचर संस्थेच्या माहितीनुसार १९ एप्रिल रोजी दाऊद त्याच्या जावयाच्या निवासस्थानी समारंभाला गेला होता. यामुळे दाऊदच्या नेमक्या स्थितीबद्दल आता उलटसुलट तर्काला उधाण आले आहे.