रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 जुलै 2020 (09:02 IST)

महत्वकांक्षा बाळगण्यात चूक काय, प्रिया दत्त यांचा सवाल

महत्वकांक्षा बाळगण्यात चूक काय असा प्रश्न विचारत काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी राजस्थान मधल्या घडामोडीवर भाष्य केलं आहे. आणखी एक सहकारी पक्ष सोडून गेला. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे हे दोघेही खूप चांगले सहकारी आणि चांगले मित्र होते. काँग्रेस पक्ष या दोघांनीही सोडला. या दोघांमध्येही काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. महत्वाकांक्षा बाळगण्यात चूक काहीही नाही. या दोघांनीही पक्ष कठीण काळात असताना खूप चांगलं काम केलं आहे असंही प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. 
 
राजस्थानात सचिन पायलट यांनी गेहलोत सरकारविरोधात बंडाचा झेंडा उभारला. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी ज्योतिरादित्य शिंदेंसोबत घेतलेली भेट आणि त्यानंतर राजस्थानात वेगाने घडलेल्या घडामोडी महत्त्वाच्या ठरल्या. दरम्यान काँग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवलं आहे. तसंच त्यांनी काँग्रेसही सोडलं आहे.