रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. नवरात्र 2023
  3. नवरात्र उत्सव
Written By
Last Modified: मंगळवार, 17 ऑक्टोबर 2023 (16:37 IST)

Navratri Festival : दिव्य तेज, दिव्य शक्ती, झळाळे दिव्यता

durga chalisa
दिव्य तेज, दिव्य शक्ती, झळाळे दिव्यता,
तेजोमय रूप तुझे, वर्णू तरी किती आता!
परमशक्ती पुढं तुझ्या नतमस्तक सर्व सृष्टी आहे,
वर्णन कराया ते, मी सर्वदा असमर्थ आहे,
शुंभ-निशूंभ राक्षसास मारून, सामर्थ्य तव दाविले,
शरण तुझ्या पुढं दानवास व्हावयास लावले,
नवरात्रीच्या पवित्र काळाचे वर्णन करण्यास  मज शब्द मिळेना,
तेजोमय काळात या, भक्तिभाव कमी कुठं  पडेना!
सर्वदा घडो तुझी सेवा, आणि न काही मागणे,
प्रसन्न तू राहावी सदा आम्हांवरी, सुकर व्हावे जगणे!!
..अश्विनी थत्ते.