बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. ऑलिंपिक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (18:23 IST)

पॅरिस पॅरालिम्पिक पदक विजेत्यांसाठी रोख बक्षिसे जाहीर

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना रोख पारितोषिक  जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीया यांनी मंगळवारी ही घोषणा केली. 

भारताने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. ही इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी होती. या स्पर्धेत भारताने सात सुवर्णासह एकूण 29 पदे जिंकली या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 75 लाख रुपये,  रौप्य पदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 50 लाख रुपये आणि कांस्य पदक जिकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला 30 लाख रुपयांची राशी जाहीर केली आहे. तसेच मिश्र संघात समाविष्ट असणाऱ्या पदक विजेत्यांना 22.5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. 
 
पॅरालिम्पिक पदक विजेते मंगळवारी मायदेशी परतल्यावर शेकडो चाहत्यांनी फुल, हार आणि मिठाई देऊन त्यांचे स्वागत केले. भारताने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि 13 कांस्य पदकांसह 29 पदकांसह आपल्या ऐतिहासिक मोहिमेचा शेवट केला.
 
भारताने 20 पदक जिंकून टोकियोचा विक्रम मोडला असून भारताने 7 सुवर्ण पदक जिंकून देखील टोकियोचा विक्रम मोडला आहे. 2028 च्या लॉस एंजेलिस पॅरालिम्पिकमध्ये आम्हाला अधिक पदके आणि सुवर्णपदके जिंकता यावीत यासाठी आम्ही आमच्या सर्व पॅरा ॲथलीट्सना सर्व सुविधा देण्याचे आश्वासन मांडवीया यांनी दिले आहे. 
Edited by - Priya Dixit