बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. प्रयाग कुंभमेळा 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जानेवारी 2019 (13:03 IST)

कुंभमेळ्याचा मौलिक / मुलभुत अर्थ जाणून घ्या..

कुंभमेळा आध्यात्मिक, ज्ञान व आपल्या संस्कृतीचा संगम आहे. यात साधू, संत, भौतिक सुखांचा त्याग केलेले महात्मे प्रेम, एकात्मिकता, बंधुभाव, आध्यात्मिकता याचा प्रसार करण्यासाठी एकत्र येतात. हे सर्व गुण कधीही रिक्त न होणाऱ्या मानवी जीवनरुपी घटातून भाविकांपर्यंत पोहचतात. कुंभमेळयादवारे आपणास पृथ्वी, आपला निसर्ग, पवित्र नदया यांचे माहात्म्य समजते. कुंभमेळा हा निसर्ग व मानवी जीवनाचा संगम देखील आहे. कुंभमेळयामुळे आपला या महत्वाच्या गुणांवरील विश्वास पुनर्जिवित होऊन आपले मन व शरीरास सदगुणांची शाश्वत शक्ती प्राप्त होते. सुरवातीच्या काळात कुंभमेळयाचे स्वरुप लहान होते. कालानुरुप कुंभमेळा संपन्न होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पुर्वीच्या कुंभमेळयापेक्षा सहभागी होणाऱ्या साधू व भाविकांची संख्या पुढील कुंभमेळयात अनेक पटीने वाढते आहे. रस्ते, दळणवळणाची साधने, इत्यादी मुलभुत सुविधांमध्ये झालेल्या विकासामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातील साधू व भाविकांना कुंभमेळयात सहभागी होणे शक्य झाले आहे. कुंभमेळा केवळ लोकांची गर्दी अथवा जत्रा नसुन कुंभमेळा ज्ञान, आध्यात्मिकता, साधुत्व व समर्पणाचा सोहळा आहे. कुंभमेळयासाठी साधूग्राम, वाहनतळे आरोग्य व स्वच्छता व्यवस्था, विदयुत व्यवस्था, पाणी पुरवठा या सारख्या सुविधा लाखो साधु व भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पुरविल्या जातात. कुंभमेळयातील सहभाग पवित्र असतो या विश्वासाने भाविक दुर दुरवरुन कुंभमेळयात सहभागी होतात. साधू व भाविकांची सेवा करण्याच्या हेतूने अन्न्‍ छत्र चालविणे, दान धर्म करणे, आरोग्य व स्वच्छता व्यवस्थेत जीवरक्षक स्वयंसेवक म्हणून काम करणे या कार्यात भाविक सहभागी होतात. शासन व प्रशासनास देखील साधू व भाविकांच्या सुविधांशी निगडीत प्रत्येक गोष्टिचे सुक्ष्म नियोजन करावे लागते.