बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : रविवार, 19 डिसेंबर 2021 (11:59 IST)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पूजा केली,बाप्पाला घातले साकडे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आगमन झाले. येथे अमित शहा यांनी मंदिरात बाप्पाला अभिषेक करून आरती केली आणि  महाराष्ट्रासह संपूर्ण भारतदेश आत्मनिर्भर होऊन कोरोनापासून मुक्त होवो ,तसेच अयोध्यातील राममंदिराची उभारणी निर्विघ्नपणे होवो . भारत देश सुजलाम सुफलाम होवो .असे साकडे बाप्पाला घातले . गृहमंत्री अमित शाह यांचे दगडूशेठ मंदिरात आगमन झाल्यावर त्यांचे स्वागत श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी , माणिक चव्हाण, हेमंत रासने, मंगेश सूर्यवंशी आणि विनायक रासने हे उपस्थित होते. गृहमंत्री आज  19 डिसेंबर रोजी पुण्यातील नवीन सीएफएसएल इमारतीचे उद्घाटन करतील आणि एनडीआरएफच्या जवानांसोबत भोजन करतील. दुपारी ते वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या दीक्षांत समारंभास उपस्थित राहतील आणि पुणे महापालिकेतील मराठा योद्धा छत्रपती शिवाजी यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करतील.