शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (07:59 IST)

ससून सर्वोपचार रुग्णालय येथील ड्रग्जबाबत चौकशी अहवाल शासनास सादर

मुंबई, : ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्जबाबात चौकशी अहवाल शासनास सादर केला असून  शासनाने अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते यांचे निलंबन करून विभागीय चौकशीचा निर्णय घेतला आहे.
 
चौकशीत अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर व अस्थिव्यंगोपचारशास्त्र पथकप्रमुख डॉ. देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी असल्याचे दिसून आले त्यामुळे  घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉ. ठाकूर  यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील ड्रग्ज संबंधित घटनेबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीला 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  समितीने चौकशी करून आपला अहवाल आयुक्तामार्फत शासनास दि.31 ऑक्टोबर 2023 रोजी सादर केला असल्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.