रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 मे 2024 (08:45 IST)

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

घाटकोपर मध्ये होर्डिंग कोसळण्याची घटना ताजी असताना पुण्यातील पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा होर्डिंग कोसण्याची घटना घडली आहे. 

पिंपरी चिंचवडच्या मोशी परिसरात गुरुवारी जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या  कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले. मोशी येथे दुपारी 4:30 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरात काही ठिकाणी पाऊस आला सोसाट्याच्या वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळले. सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. 
सोसाट्याच्या वाऱ्याने मोशीतील जय गणेश साम्राज्य चौक येथे रस्त्याचे कडेला उभारलेले होर्डिंग कोसळले यात चार दुचाकी आणि टेम्पोचे नुकसान झाले आहे. 
होर्डिंग कडेला कोसळल्याने वाहतुकीला कोणताही त्रास झाला नाही. होर्डिंगला उचलण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. 

Edited by - Priya Dixit