रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 8 ऑगस्ट 2021 (17:13 IST)

मोठी बातमी ! पुण्यात अखेर निर्बंधात सूट,सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळ पासून रात्री पर्यंत सुरु

पुणेकरांसाठी ही खुशखबर आहे जिल्ह्याचे पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुण्यातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री पर्यंत सुरु असणार असा निर्णय घेण्यात आला.हॉटेल आणि रेस्टोरेंट आठवड्यातील सर्व दिवस रात्री दहावाजे पर्यंत सुरु असतील अशी माहिती राज्याचे उपमुख्य मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. 
 
पुण्यातील लावलेले वीकेंड लॉकडाउन देखील रद्द करण्यात आले आहे. पुण्यातील दुकाने त्यांच्या साप्ताहिक सुट्टीनुसार आठवड्यातून एक दिवस बंद राहणार.मॉल मध्ये लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच प्रवेश देणार.मॉल जिम,जलतरण तलावासाठी नवीन नियमावली लागू केली जाणार असे ही ते म्हणाले.

पुण्याच्या ग्रामीण भागात सुद्धा सध्या लेव्हल 3 ची नियमावली सुरूच असणार.सध्या जरी निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी ही पॉजिटीव्ह रेट 7 टक्के झाल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील असे ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.