भाजपने महाराष्ट्रात सुरु केले 'घर चलो अभियान', दीड कोटी लोकांना भाजपचे सदस्यत्व देणार
1.5 कोटी लोकांना भाजपचे सदस्यत्व देण्यासाठी भाजपने महाराष्ट्रात घर चलो अभियान सुरु केले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
पुण्यात या अभियानाअंतर्गत 1 लाख बूथला भेट देण्याचे उध्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. या साठी ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहे. सुमारे 1.5 कोटी लोकांना सदस्यत्व बनवण्यासाठी भाजप घर चलो अभियान राबवत आहे.
ज्यांना भाजपच्या पक्षात प्रवेश घ्यायचा आहे त्यांना आम्ही प्राथमिक सदस्यत्व देऊ असे बावनकुळे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मोहिमेत आज सहभागी होणार असून या मोहिमेमुळे एनसीपी शरद पवार आणि विजय वडेट्टीवार यांनी मान्य केले आहे की, आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांचा विश्वास जिंकत आहोत.
आज या मोहिमेची पहिली फेरी असून येत्या 14, 17 आणि 20 तारखेला ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
पक्षाने डिसेंबर 2024 मध्ये सदस्यत्व मोहीम सुरू केली होती आणि राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 50,000 सदस्य बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते. संबंधित घडामोडीत, पालघर जिल्ह्यातील वसई आणि नायगाव येथील अनेक शिवसेना (उबाठा) आणि बहुजन विकास आघाडी (BVA) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने वसई आणि नायगाव बीव्हीएकडून हिसकावून घेतले होते.
Edited By - Priya Dixit