रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 मार्च 2021 (20:34 IST)

श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये १० ते १२ पर्यंत संचारबंदी

महाशिवरात्रीनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दरवर्षी होणारी गर्दी व यंदा कोरोनाचा धोका विचारात घेऊन प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुधवार (दि. १०) ते शुक्रवार (दि. १२) पर्यंत येथे संचारबंदी असेल, अशी माहिती घोडेगाव ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
 
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कलम १४४ अन्वये श्री. क्षेत्र भीमाशंकर परिसरात कोणत्याही व्यक्तीला संचार करणे, उभे राहणे, रेंगाळण्यास मनाई केली आहे. त्यामुळे यंदा महाशिवरात्रीला भाविकांनी श्री. क्षेत्र भीमाशंकर येथे येऊ नये. तसेच देवस्थान ट्रस्टनेही यात्रेचे नियोजन करू नये असे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे. तसेच ऑनलाइन दर्शन प्रणालीचा वापर करून भाविक भक्तांना मोबाइल अ‍ॅपद्वारे दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे यावेळी सांगण्यात आले.
 
तसेच पाच आणि पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार नाहीत. तसेच सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणूक आणि पालख्या काढण्यात येऊ नयेत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात म्हटल्याचे देवस्थान ट्रस्टने सांगितले.