मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (13:36 IST)

आता पुण्यात डासांचे वादळ दिसले, नागरिकांची तारंबळ

पुण्यात सध्या डासांच्या वादळाने नागरिकांना हैराण केले आहे. पुण्यातील मुठा नदीच्या परिसरात हे डासांचे वादळ दिसतात. त्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर आले आहे.हे दृश्य बघून लोक हैराण झाले आहे.डासांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

पुण्यातील  केशव नगर खराडी जवळील मुठा नदीवरचा हा व्हिडीओ आहे. मुठा नदी जवळ टोलजंग इमारतीवर डासांचे मोठे वादळ दिसत आहे. या वेळी लाखोंच्या प्रमाणात डास एकाच वेळी दिसत आहे. हे लोकांच्या आरोग्यासाठी खूपच धोकादायक आहे. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर दिसत आहे. या व्हिडीओ मध्ये एकाच वेळी सात ते आठ मोठ्या रांगेत घोंगावत दिसत आहे. हे डास कुठून आले आणि कशामुळे आली हे समजू शकले नाही. 
या भल्या मोठ्या डासांमुळे पुण्याच्या नागरिकांच्या आरोग्याला हे धोकादायक आहे.  
 याचा व्हिडीओ एका Maze .Pune या इंस्टाग्राम वरून शेअर करण्यात आला असून या मध्ये नेटकरी आपापल्या प्रतिक्रिया देत आहे. काहींनी स्वच्छ पुणे सुंदर पुणे वर कॉमेंट्स केली आहे. 

Edited By- Priya Dixit