शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (09:27 IST)

पुण्यात केवळ १७ टक्के नागरिकांचे लसीकरण

पुणे महानगरपालिका(पीएमसी) क्षेत्रामध्ये १५ जूनपर्यंत केवळ १७ टक्के नागरिकांचे लसीकरण केले गेले आहे. तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) मध्ये हे प्रमाण ११ टक्के आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. पीएमसीमध्ये १८ ते ४४ वर्षे वयोगटातील केवळ दोन टक्के लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. तर, ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील १० टक्के नागरिकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र आहे.
 
खासगी रुग्णालयांनी शहरी भागात लसीकरण सुरु केल्याने लसीकरणाची व्याप्ती वाढली आहे. आता सरकारी व खाजगी पुरवठ्याचे प्रमाण लसींसाठी निश्चित केले गेले आहे, आता आमच्याकडे अधिक साठा आहे आणि लवकरच १ लाखांच्या वर पोहोचण्याचा आमचा मानस आहे,” असे प्रसाद यांनी सांगितले. पुणे महानगरपालिका(पीएमसी) क्षेत्रामध्ये पहिला लस घेणाऱ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. १०० टक्के फ्रंटलाइन कामगार आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. १८ ते ४४ वर्षे आणि ४५ ते ५९ वयोगटातील ७९ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.
 
त्याचप्रमाणे, पिंपरी चिंचवडमध्ये देखील, आरोग्य कर्मचाऱ्यांचे लस घेण्याचे प्रमाण जास्त असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, १८ ते ४४ वयोगटातील लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण केवळ ५ टक्के आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही फक्त चार टक्के १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली