गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (09:53 IST)

मी पण सामान्य नागरिक आहे असे शरद पवारांनी म्हटल्यावर एकच हशा

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढी पाडव्या दिवशी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला.  आता राज ठाकरेंच्या या निर्णयावर खासदार शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची पुण्यात पत्रकार परिषद पार पडली.
 
" गेल्या १० ते १५ वर्षात राज ठाकरेंचे ३, ४ निर्णय मी बघितले आहेत,असा टोलाही पवार यांनी ठाकरेंना लगावला. "कधी भाजपाबाबत एकदम तिखट प्रतिक्रिया दिली आणि बाजूला झाले. कधी पाठिंबा दिला. त्यांना नक्की काय करायचं होतं हे मला सांगता येणार नाही. त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता पाठिंबा दिला आहे. बघू दोन तीन दिवसात काय ते स्पष्ट होईल. त्यांनी असा निर्णय का घेतला हे राज ठाकरेच स्पष्ट करु शकतील, असंही शरद पवार म्हणाले.
 
शरद पवार म्हणाले, अनेक संस्था काम करत असतात, एजन्सीज काम करत असतात त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला का? हे काही मला माहीत नाही. यावेळी पत्रकारांनी पवारांना राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत सामान्य माणसं संभ्रमात आहेत असं शरद पवारांना विचारलं असता “मी पण सामान्य नागरिक आहे” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. यावर सभागृहात हशा पिकला.

Edited by -Ratnadeep Ranshoor