मनसेचा महायुतीला पाठिंबा; राज ठाकरेंची मोठी घोषणा
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यासोबतच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेला ठाकरे बोलत होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी दिल्लीत झालेल्या बैठकीनंतरच राज ठाकरे भाजपसोबत युती करतील, अशी अपेक्षा होती. आता मनसे प्रमुखांनी अधिकृतपणे त्यांचा पक्ष एनडीएशी युती करणारअसल्याचे जाहीर केले आहे. महाराष्ट्रात महायुतीला पाठिंबा जाहीर करण्यासोबतच त्यांनी कार्यकर्त्यांना आता थेट विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले आहे.
गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क मैदानावर बोलतांना राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षाच्या राजकीय रस्सीखेचावर देखील भाष्य केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख होणार का? यावर देखील आपली भूमिका व्यक्त केली. मी पक्ष फोडणार नाही, मी स्वत:चा पक्ष काढेल. मला शिवसेनेचा प्रमुख व्हायचे असेल तर तेव्हाच झालो असतो. मी फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले.
Edited by -Ratnadeep Ranshoor