सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : रविवार, 17 एप्रिल 2022 (10:38 IST)

राज ठाकरे यांची आज दुपारी पुण्यात पत्रकार परिषद

Raj Thackeray
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल हनुमान जयंती निमित्त महाआरती केली. आज त्यांची दुपारी 12 वाजता पुण्यात पत्रकार परिषद होणार असून आता या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 
 या महिन्याच्या सुरुवातीला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या दोन सभांमध्ये मशिदींमधून लाऊडस्पीकर न काढल्यास या धार्मिक स्थळांसमोर मोठ्या आवाजात हनुमान चालीसाचे पठण केले जाईल, असा इशारा दिला होता. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला त्यांच्या मागणीवर 3 मेपूर्वी कार्यवाही करण्याचा अल्टिमेटमही दिला आहे.
 
यामुद्द्यावरून विरोधकांकडून राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. आज राज ठाकरे पत्रकार परिषदेतून विरोधकांना काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे. राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांचा पुण्यात दुसरा दिवस आहे. काल त्यानी महाआरती केली 
 
त्यावर संजय राऊतांनी राज ठाकरे यांना 'नवहिंदुत्ववादी ओवेसी' असं म्हणत टीका केली. राज्य सरकार ला राज ठाकरे यांनीमशिदीवरील भोंगे उतारवण्याबाबत कारवाई करण्याचे  3 मे पर्यंतचे अल्टिमेटम दिले असून त्यावर गृहमंत्र्यांनी या अल्टिमेटम ला नाकारत मशिदीवरील भोंगे उतरवले जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 
 
आज राज ठाकरे यांनी दुपारी पत्रकार परिषद असून विरोधकांना ते काय उत्तर देतात य आकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.