शनिवार, 24 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Updated : शनिवार, 14 जानेवारी 2023 (10:00 IST)

पुण्यात संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या, घरातून4 मृतदेह आढळले

पुण्यातील मुंढवा भागातील केशव नगरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आला आहे. यामध्ये 24 वर्षीय मुलगा आणि 17 वर्षीय मुलीचा समावेश आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सर्व मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे.
 
कुटुंबातील चारही जणांनी एकत्र आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. मृत्यूची माहिती लोकांना कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
 
Edited By- Priya Dixit