गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018 (12:46 IST)

या वर्षी राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त, धनिष्ठा पंचक बाधक बनेल का?

रक्षाबंधन पौर्णिमेचा सण या वर्षी 26 ऑगस्ट रोजी येत आहे. या वर्षी सर्वात चांगली बाब म्हणजे राखीच्या दिवशी भद्रा नाही आहे, म्हणून रक्षाबंधन सकाळपासून रात्रीपर्यंत साजरा करण्यात येईल, पण मधला काही वेळ सोडावा लागणार आहे कारण अशुभ चौघड़िया, राहू काल, यम घंटा आणि गुली काल राहणार आहे.   
 
ज्योतिष पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजेपासून 16 मिनिटाने सुरू होईल जे 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 25 मिनिटापर्यंत राहणार आहे. या दिवशी धनिष्ठा नक्षत्र दुपारी 12.35 पर्यंत राहणार आहे.   
 
रक्षाबंधनचा मुहूर्त 26 ऑगस्ट रोजी सकाळी 7.43 पासून दुपारी 12.28 वाजेपर्यंत राहणार आहे. यानंतर दुपारी 2.03 ते 3.38 पर्यंत राहणार आहे. संध्याकाळी 5.25ला पौर्णिमा तिथी समाप्त होईल, पण सूर्योदय व्यापिनी तिथी असल्याने रात्री देखील राखी बांधता येईल.   
 
हे आहे शुभ मुहूर्त
 
प्रातः 7.43 ते 9.18 पर्यंत चर
प्रातः 9.18 ते 10.53 पर्यंत लाभ
प्रातः10.53 ते 12.28 पर्यंत अमृत
दुपारी: 2.03 ते 3.38 पर्यंत शुभ
सायं: 6.48 ते 8.13 पर्यंत शुभ
रात्री: 8.13 ते 9.38 पर्यंत अमृत
रात्री: 9.38 ते 11.03 पर्यंत चर
 
या वेळेस राखी बांधणे टाळायला पाहिजे, अशुभ आहे ही वेळ  
 
राहू काल प्रातः 5.13 ते 6.48
यम घंटा दुपारी: 12.28 ते 2.03
गुली काल दुपारी: 3.38 ते 5.13
काल चौघड़िया दुपारी. 12.28 ते 2.03
 
धनिष्ठा पंचकाची बाधा नाही आहे  
धनिष्ठा ते रेवतीपर्यंत पाच नक्षत्रांना पंचक म्हटले जाते. हे पंचक पाच दिवसांपर्यंत चालतो. पंचकाबद्दल असे भ्रम आहे की यात कुठलेही कार्य करू शकत नाही. जेव्हा की सत्यता अशी आहे की पंचकात अशुभ कार्य नाही करायला पाहिजे कारण त्यांची पाच वेळा पुनरावृत्ती होते. पंचकात शुभ कार्य करण्यात अडचण नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र असल्याने पंचक राहणार आहे, पण राखी बांधण्यास हे बाधक नाही आहे.