1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

'छावा'चे अण्णासाहेब जावळे यांचे निधन

छावाचे अण्णासाहेब जावळे यांचे निधन
WD
अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे पाटील (35) यांचे मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारस पुणे येथील रुबी हॉस्पिटलमधये निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मूळचे उस्मानाबाद तालुक्यातील मेंढा येथील रहिवासी असलेले अण्णासाहेब गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. चार दिवसांपूर्वी पोटात कावीळ उतरल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांना तेथील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात पा‍ठविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांना सोमवारी एअर अॅम्ब्युलन्सने पुणे येथील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांचे निधन झाले, अशी माहिती छावाचे लातूर बीड जिल्हा संपर्कप्रमुख राजाभाऊ गुंजरगे व लातूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी दिली.