बुधवार, 20 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 21 मे 2016 (13:37 IST)

पेपर सोडवण्यासाठी मदत; कारकून, अधिकाऱ्याला अटक

विद्यापीठातील इंजिनिअरिंग मुलांना पेपर सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या 4 कारकून, 3 शिपाई आणि एका अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले आरोपी परीक्षेवेळी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून पैसे 
घ्यायचे. त्यानंतर विद्यार्थी पेपरला केवळ हजेरी लावून, उत्तरपत्रिका कोरी सोडून जायचे. त्यावेळी पैसे घेतलेले कर्मचारी विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट घ्यायचे. मग पेपर संपलेल्या रात्री त्या विद्यार्थ्याचा पेपर बाहेर काढायचे, संबंधित विद्यार्थ्याला बोलावून त्याला गुपचूप परत पेपर द्यायचे. हा पेपर विद्यार्थी घरी घेऊन जायचे आणि दुसऱ्या दिवशी याच उत्तरपत्रिका विद्यापीठात जमा केल्या जात, अशी माहिती पोलिसांनी दिली.