प्रकल्पग्रस्तांचे आवाहन; निलेश राणेंना मतदान करू नका!
सिंधुदुर्गमधील विविध 15 प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी कॉंग्रेसचे खासदार निलेश राणे यांना मतदान न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राणे यांना मतदान न करण्याचेही आवाहन केले आहे. यासाठी प्रकल्पग्रस्त गावा-गावात जाऊन जनजागृती करणार असून, एक एसएमएस हेल्पलाईन सुविधाही त्यांनी तयार केली आहे.
कुडाळ एमआयडीसी परिसरात झालेल्या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे काँग्रेस उमेदवार निलेश राणेंना मतदान न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. राणे पिता-पुत्रांची कोकणात मोठी दहशत असल्याचा आरोपही प्रकल्पग्रस्तांनी केला आहे. प्रकल्पग्रस्तांवर होणारा अन्याय रोखणे आणि राणेंची दहशत थांबवणे हा मुख्य उद्देश असल्याचेही प्रकल्पग्रस्तांनी सांगितले.