1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. महाराष्ट्र माझा
Written By वेबदुनिया|

मच्छिंद्र कांबळी यांचे निधन

जेष्ट रंगकर्मी, प्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक निर्माते मच्छिंद्र कांबळी यांचे रविवारी (दि.30 ऑक्टोबर) संध्याकाळी येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते.

हृदयविकाराच्या त्रास होऊ लागल्याने कांबळी यांना शनिवारी येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता त्यांची अंत्ययात्रा दादर येथील शिवाजी मंदिर येथून निघणार आहे. सकाळी दहाच्या आसपास त्यांचे पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

मालवणी भाषा सातासमुद्रापार पोहोचवणारे कांबळी यांचे वस्त्रहरण या पहिल्याच व्यावसायिक मराठी नाटक रंगभूमीवर प्रचंड गाजले. या नाटकाने मालवणी भाषेचा वेगळा ठसा उमटवला. या नाटकातील तात्या सरपंच यांची भूमिका पार पाडणाने कांबळी यांच्या अभिनयाची सर्वत्र स्तुती झाली. त्यांचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचले.

वस्त्रहरण इतके प्रसिध्द झाले की त्याचे काही प्रयोग अमेरीकेतही झाले. आत्तापर्यंत त्याचे 4899 प्रयोग झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी अनेक नाटके केली, मराठी चित्रपटातही अनेक भूमिका केल्या. भद्रकाली प्रॉडक्‍शन' या नावाने त्यांनी निर्मिती संस्थाही काढली.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेल्या कांबळी यांनी पांडगो इलो रे, घास रे रामा, केला तुका झाला मका, चाकरमानी, येवा, कोकण आपलाच आसा, रातराणी, पती माझा छत्रीपती, भय्या हातपाय पसरी' या नाटकांमध्ये भूमिका केली तसेच यांची निर्मितीही केली.