मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (16:48 IST)

‘गरम पाण्याच्या नावाखाली कोमट पाणी’; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणावर ‘मनसे’चा निशाणा

दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. यानंतर आता विरोधकांकडून देखील पलटवार केला जात आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे पर्वणी असायची आता मात्र सगळंच अळणी. गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी, असल्याची टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (sandeep deshpande mns) यांनी केली आहे.
 
दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी. गरम पाण्याच्या नावाखाली नुसतंच कोमट पाणी.

 
दरम्यान, विरोधकांकडून टीका केली जात असली तरी महाविकास आघाडीतील नेते मात्र ठाकरेंच्या भाषणाचे समर्थन करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख यांचे दसरा मेळाव्यातील आजचे भाषण म्हणजे “सौ सोनार की एक लोहार की” असे होते. महाराष्ट्राच्या मनातील अनेक वर्षांची खदखद देशासमोर मांडल्याबद्दल उद्धवजी ठाकरे साहेब यांचे आभार. प्रबोधनकार ईज बॅक, असे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मेटकरी (ncp mla amol mitkari) यांनी केले आहे.