सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:35 IST)

खडकवासला धरणसाखळीत २१.४१ अब्ज घनफूट पाणीसाठा

Khadakwasla dam
खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांतील पाणीसाठा २१.४१ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधी चारही धरणांतील पाणीसाठा २५.९६ टीएमसी एवढा होता. चारही धरणे सध्या ७३.४६ टक्के भरल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली.
 
खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. जुलै महिन्यात सलग आठ ते दहा दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे तळाला गेलेला पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली. आजमितीस चारही धरणे ७३. ४६ टक्के भरली असून त्यामध्ये २१.४१ टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. चारही धरणात समाधानकारक पाणीसाठा असल्याने शहराच्या वर्षभराच्या पाण्याची समस्या संपुष्टात आली आहे. खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी विश्रांत घेतली. या चारही धरणात गेल्या चोवीस तासांत शून्य मिलीमीटर पावसाची नोंद जलसंपदा विभागाकडे करण्यात आली आहे. खडकवासला धरणातून आत्तापर्यंत एकूण ३. ३४ टीएमसी एवढ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.