शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 एप्रिल 2023 (13:25 IST)

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत

bus accident
ANI
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आज सकाळी पहाटे 4च्या सुमारास एक खासगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. ही घटना बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ घडली.अपघातात 12 लोक मृत्यूमुखी पडले आहे.  या बसमध्ये 40 ते 45 प्रवासी होते.  या घटनेत 20 ते 25 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या बस मध्ये बाजीप्रभु वादक गट (झांज पथक) गोरेगाव येथील कार्यकर्ते होते. हे सर्व पुण्यात शुक्रवारी झालेला कार्यक्रम संपवून परत जात असताना ही घटना घडली आहे. ही बस तब्बल 40 ते 50 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळाली आहे.
 
 पघातग्रस्ताच्या मदतीला हायकर्स ग्रुप, आयआरबी टीम दाखल झाली आहे. खाजगी रुग्णालयातील डॉक्टर्सनाही मदतीसाठी बोलावण्यात आलं आहे.
 
अतिरिक्त एसपी अतुल यांनी सांगितले की, मृत आणि जखमींचे वय 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान आहे. पोलिसांनी सांगितले की, स्थानिक पोलिसांचे एक पथक आणि ट्रेकर्सचा एक गट सध्या बचाव कार्यात गुंतला आहे. खोपोली हे शहर मुंबईपासून 70 किमी अंतरावर आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बस खड्ड्यात पडून झालेल्या भीषण अपघाताबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मृत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.